Wed. Oct 5th, 2022

राजस्थानमध्ये वायुसेनेचे मिग-27 हे विमान कोसळलं

राजस्थानमध्ये जोधपूरमध्ये वायुसेनेचे मिग 27 हे लढाऊ विमान कोसळले आहे. सिरोहीच्या गोंडानामधील शिवगंज येथे आज सकाळी ही 11.45 च्या दरम्यान ही घटना घडली असून यामध्ये कोणतीही जिवतहानी झाली नाही. हा प्रकार नियमित सरावा दरम्यान घडला आहे. हे विमान कोसळल्यानंतर या विमानाला आग लागली.या घटनेची माहिती मिळताचं पोलीस आणि वायूसनेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

नेमक काय घडलं?

उटारलाई हवाई दलाच्या बेसवरून या विमानाने उड्डाण घेतलं होतं.

काही वेळातचं तांत्रिक बिघाड झाल्यामुळे जोधपूरपासून १२० किलोमीटर अंतरावर हे विमान कोसळलं.

हे विमान रामदेवरा गावाच्याजवळ शेतामध्ये कोसळले होते.

हे विमान कोसळण्याआधी पालयटने पॅराशूट घेऊन उडी मारली त्यामुळे तो वाचला.

घटनास्थळावर पोलीस आणि वायुसेनेच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली.

या दुर्घटनेप्रकरणाची न्यायालयिन चौकशीचे आदेश दिले आहेत.

८ मार्चला राजस्थानच्या बिकानेरमध्ये भारतीय वायुदलाचे विमान कोसळले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.