Sat. Mar 6th, 2021

भारतीय वंशाची महिला नासा संस्थेच्या कार्यकारी प्रमुख पदावर

भारतीय वंशाची भाव्या लाल यांची निवड नासा या संस्थेच्या कार्यकारी प्रमुख पदावर करण्यात आली आहे. ही घोषणा नासाने एका पत्रकाद्वारे जारी केले आहे. भाव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
भाव्या यांच्यासह नासामधील इतर प्रमुख पद नियुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या परिक्षम मसितीच्या सदस्य म्हणून निवडलं असून ही गोष्ट भारतासाठी महत्वाची आहे.

भाव्या यांना अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधन या क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. शिवाय भाव्या यांनी नासाच्या इनोव्हेटिव्ह अ‍ॅडव्हान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्रॅम म्हणजेच नवीन संकल्पनांवर काम केलं आहे. भाव्या या अ‍ॅडव्हायझरी काऊन्सीलसाठी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पा आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या सदस्य देखील होत्या. एसटीपीआय मध्ये सहभागी होण्याअगोदर त्या सी-सटीपीएस एलएलसीच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यापूर्वी भाव्या यांनी केंब्रिजमधल्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राचे संचालक पद हे देखील भूषवले होते. अमेरिकेच्या न्यूक्लिअर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेच्या अध्यक्षस्थानीही भाव्या यांची नियुक्ती करण्यात आली होती.

अंतराळ क्षेत्रातील संशोधनामध्ये भाव्या यांनी मोठं योगदान दिलं आहे. शिवाय त्यांनी सार्वजनिक प्रशासन या विषयात यांनी डॉक्टरेट केलं आहे. विज्ञान विषयक अनेक कार्यक्रमांच्या आणि संस्थांचं प्रमुख पद भूषवणाऱ्या भाव्या यांच्यावर आता थेट नासाच्या कार्यकारी प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाव्या लाल या नासामधील वरिष्ठ आर्थिक सल्लागार म्हणूनही काम बघणार आहे आणि
कोणत्या अंतराळ मोहिमेसाठी किती खर्च करण्यात यावा याचसोबत इतर आर्थिक सल्ले देण्याची जबाबदारी ही भाव्या यांच्या खांद्यावर असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *