Mon. Jul 22nd, 2019

भारतीय सैन्याचा अपमान केला; मोदींचे सॅम पित्रोदांना प्रत्युत्तर

168Shares

पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक केला. मात्र हा एअर स्ट्राइक खरंच केला होता का? तसेच या एअर स्ट्राइकमध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता का ? असे काही प्रश्न इंडियन ओव्हरसीज कॉंग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी उपस्थित केला. त्यांच्या या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. कॉंग्रेसच्या वतीने पित्रोदा यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे अशी टीका नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

मोदींचे नेमकं ट्विट काय ?

सर्वात विश्वासू सल्लागार आणि कॉंग्रेस अध्यक्षांच्या मार्गदर्शकांनी भारतीय सैन्याचा अपमान केला असून पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे.

कॉंग्रेसला कधीच दहशतवादाला उत्तर द्यायचं नव्हतं ते पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

मोदी म्हणाले, हा नवा भारत आहे. दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल.

तसेच विरोधक नेहमी भारतीय सैन्याचा अपमान करत आहेत.

माझ्या सहकारी भारतीयांना आवाहन करतो की त्यांनी विरोधी नेत्यांना त्यांच्या वक्तव्याचा जाब विचारावा.

भारतीय सुरक्षा दलांसोबत ठाम उभे आहेत.

बालाकोट हल्ल्यात खरंच ३०० दहशतवाद्यांचा मृत्यू झाला का?-सॅम पित्रोदा

 

168Shares

Leave a Reply

%d bloggers like this: