सरकारी बाबूंनी थेट भारतीय लष्करालाच घातला गंडा
वृत्तसंस्था, काश्मीर
आजपर्यंत सरकारी बाबूंनी सामान्यांची फसवणूक केली आहे. मात्र आता तर त्यांची मजल इथपर्यंत गेली. की त्यांनी टक्क भारतीय लष्करालाच गंडा घातला आहे.
काश्मीरमध्ये हा प्रकार उघडकीस आला. काश्मीरच्या महसूल खात्यात काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील जमिनीचं भाडं भारतीय लष्कारकडून वसूल करण्याचा प्रताप केला.
राजौरी सेक्टरच्या खंबा गावातील जमीन 1 एप्रिल 1972 पासून भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. लष्करानं 2003 पर्यंत या जमिनीचे भाडंही भरलं.
मात्र ही जमीन प्रत्यक्षात पाकव्याप्त काश्मीर किंवा ‘नो मॅन्स लँड’ भागात विभागली गेली आहे. आणि ती भारताच्या ताब्यात असल्याचं दाखविण्यासाठी महसूल अधिकाऱ्यांनी या जमिनीची बनावट कागदपत्रं तयार केली होती अशी माहिती राज्य दक्षता संघटनेने केलेल्या चौकशीत समोर आली. याप्रकरणी अर्थमंत्री अरुण जेटलींनीही कबुली दिली असून या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं.