Tue. May 18th, 2021

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामधून रोहित शर्माला वगळण्यात आलं.

रोहिला दुखपात झाली असेल तर याबद्दल पारदर्शकता असायला हवी…

सध्या आयपीएलचा जल्लोष सुरू आहे आणि यादरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला वगळण्यात आलं आहे. भारतीय संघाची घोषणा झाल्याच्या काही तासानंतर मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा नेटमध्ये सराव करत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यात आला रोहित यामध्ये बॅटिंग करताना दिसत आहे. यानंतर गावसकर यांनी रोहितच्या चाहत्यांना दुखापतीसंबंधी योग्य माहिती मिळाली पाहिजे असं म्हटलं आहे.

किंग्स इलेव्हन पंजाबविरोधातील सुपर ओव्हरमध्ये रोहित शर्माला डाव्या पायाला दुखापत झाली होती त्यामुळे रोहित गेले दोन सामने खेळू शकला नव्हता आणि यातच आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषणा झाली आहे विशेष म्हणजे मयांक अग्रवालला देखील दुखापत झालेली असताना त्याचं नाव जाहीर झालं आहे.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर यांनी म्हटलं  “रोहित शर्माला नेमकी काय दुखपात आहे याची मला कल्पना नाही त्याला लागलं असतांना सराव करण्याची काही गरज नव्हती. जर रोहिला दुखपात झाली असेल तर याबद्दल पारदर्शकता असायला हवी आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांना हे जाणून घेण्याचा इतरांपेक्षा जास्त हक्क आहे आणि बीसीआयने रोहित शर्माच्या दुखापतीवर आमचे लक्ष असणार  अशी देखील माहिती दिली आहे.


१० नोव्हेंबरला आयपीएलचा अंतिम सामना झाल्यानंतर १४ नोव्हेंबपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल होईल. या दौऱ्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन एकदिवसीय, चार कसोटी आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. विराट कोहली संघाचं नेतृत्व करणार तर के एल राहुलला उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *