Fri. Sep 17th, 2021

भारतीय क्रिकेटपटू अंबातीच्या गोलंदाजीवर बंदी!

भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडूच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनवर आक्षेप घेण्यात आले होते. तर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) रायडूवर आंतरराष्ट्रीय सामन्यात गोलंदाजी करण्यास बंदी घातली आहे.

अंबातीच्या गोलंदाजीवर बंदी का ?

  • New Zealand मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या वन डे सामन्यात अंबातीने फिरकी गोलंदाजी केली होती.
  • तेव्हा पंचांनी त्याच्या गोलंदाजीच्या अ‍ॅक्शनवर आक्षेप घेतले होते.
  • त्या संदर्भातील अहवाल सामना अधिकार्‍यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाच्या हाती दिले होते.
  • नियमाप्रमाणे त्याने 14 दिवसांमध्ये ICC समोर गोलंदाजीची चाचणी देणे आवश्यक होते.
  • मात्र चाचणी दिली नसल्याने त्याच्या गोलंदाजीवर बंदी घालण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय सामन्यात बंदी घालण्यात आली असली तरी  स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये अंबाती रायडूला गोलंदाजी करता येणार असल्याचे ICC ने यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *