Wed. Oct 27th, 2021

मिस्टर आयपीएल सुरेश रैनाचा 33 वा वाढदिवस

मुंबई : टी-20 स्पेशालिस्ट अशी ओळख असलेला टीम इंडियाचा खेळाडू सुरेश रैना याचा आज 33 वा वाढदिवस. सुरेश रैनाला वाढदिवसानिमित्त आयसीसी, बीसीसीआय, चेन्नई सुपर किंग्जने तसेच सहकाऱ्यांनी ट्विटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

सुरेश रैनाची आंतरराष्ट्रीय कारकिर्द

सुरेश रैनाने वनडे आणि टेस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. रैनाने वनडेमध्ये 30 जुलै 2005 तर टेस्टमध्ये 26 जुलै 2010 साली पदार्पण केले होते. तर 1 डिसेंबर 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण केले होते.

क्रिकेटच्या तीन्ही प्रकारामंध्ये टीम इंडियाकडून शतक लगावणारा रैना हा एकमेव खेळाडू आहे. 

वनडे आणि टेस्टच्या तुलनेत सुरेश रैना टी-20 प्रकारात सर्वात जास्त यशस्वी ठरला आहे. टीम इंडियाकडून टी-20 क्रिकेटमध्ये पहिलं शतक लगावण्याची कामगिरी सुरेश रैनाने केली होती.

आयपीएलमधील कामगिरी

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्डदेखील सुरेश रैनाच्या नावावर आहे. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये एकूण 193 मॅच खेळल्या आहेत. तर आयपीएलमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्यांच्या यादीत सुरेश रैना दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आयपीएलमध्ये सुरेश रैनाच्या नावावर एकूण 5368 धावा आहेत.   

आयपीएलमध्ये सरेश रैना चेन्नई टीमचे प्रतिनिधित्व करतो. आयपीएलमध्ये सर्वात आधी 5 हजार धावांचा टप्पा गाठणारा सुरेश रैना पहिलाच बॅट्समन आहे.

आयपीएलमध्ये सुरेश रैनाने 38 अर्धशतक लगावले आहेत. यापैकी 33 अर्धशतक हे चेन्नईकडून खेळताना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *