Fri. Sep 20th, 2019

#QATIND भारताने बलाढ्य कतारला बरोबरीत रोखले

0Shares

फिफा वर्ल्डकप क्वालिफायर स्पर्धेच्या आशियाई पात्रता फेरीत भारताने बलाढ्य कतारला बरोबरीत रोखण्याची किमया केली आहे. आशियाई विजेता असल्याने कतारसमोर भारताचा निभाव लागणार नाही असा अंदाज बांधला गेला होता, पण भारतीय टीमने कतारचं आव्हान परतवून लावलं.

जागतिक क्रमवारीत 62 व्या क्रमांकावर असलेल्या कतारसाठी जागतिक क्रमवारीत 103 क्रमांकावर असलेल्या भारताविरूद्धचा सामना तुलनेनं सोपा मानला जात होता.

पण भारताने कडवी झुंज देत सगळ्यांचा अंदाज खोटा ठरवला.

आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या कतारला भारतीय बचावपटूंनी गोल करू दिला नाही.

खास उल्लेख करावा लागेल तो भारताचा स्टार गोलकीपर गुरप्रीत सिंगचा. गुरप्रीत सिंगने कतारच्या आक्रमणांना यशस्वीपणे परतवून लावलं.


 

सामना संपल्यावर स्टेडियममध्ये उपस्थित भारतीय पाठिराख्यांनी भारतीय खेळाडूंसाठी टाळ्यांचा गजर केला. भारतीय फुटबॉलपटूंनीही त्यांना मिळालेल्या पाठिंब्यासाठी आभार व्यक्त केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *