Mon. Sep 27th, 2021

६१० लोकांना वाचविण्यात बचाव पथकांना यश

‘तौत्के’ चक्रीवादळाचा तडाखा बाॅम्बे हाय परिसरातील तेल विहिरींसाठी काम करणाऱ्या विविध नौका आणि व्यापारी तराफांना बसला आहे. अत्यंत खराब हवामानामुळे भरकटलेल्या ५ नौकांमधील ६१० लोकांची सुटका करण्यात मदत आणि बचाव पथकांना यश आले आहे, तर अद्याप ९३ लोकांचा शोध सुरू आहे.

तौत्के चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात अडकलेल्या बार्ज आणि विविध नौकांवर अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदल, तटरक्षक दल, ओएनजीसीसह विविध यंत्रणांकडून शोध आणि बचाव मोहीम सुरू आहे. बियास, बेतवा आणि तेग या जहाजांनी मुंबईपासून ३५ सागरी मैल अंतरावर बुडालेल्या पी-३०५ या नौकेवर अडकलेल्या २७३ जणांच्या सुटकेची मोहीम हाती घेतली.

दुसऱ्या मोहिमेत गॅल कन्स्ट्रक्टर या नौकेवरील १८० जणांची सुटका करण्यात भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या पथकांना यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *