Tue. Oct 26th, 2021

#IndianNavy …म्हणून आज साजरा केला जातो ‘इंडियन नेव्ही डे’

आज ‘इंडियन नेव्ही डे’ आहे. आजचा दिवस म्हणजेच 4 डिसेंबर इंडियन नेव्ही डे म्हणजेच भारतीय नौदल दिन म्हणून ओळखला जातो. भारतीय महासागर क्षेत्रात संतुलन आणि सुरक्षा राखण्याचे काम नौदलाकडून होते. 1934 मध्ये ब्रिटीशांनी स्थापलेल्या ‘रॉयल इंडियन नेव्ही’ या सेनेपासून भारतीय नौदलाची सुरूवात झाली.

1971 साली भारत – पाकिस्तान युद्धात नौदलाने चढविलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे विजयश्री मिळविणे अधिक सुकर झालं. हा हल्ला 4 डिसेंबरलाच चढवण्यात आला. याचीच आठवण म्हणून 4 डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

भारतीय नौदलाचा इतिहास

भारताच्या नौदलानं 1971 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर हल्ला करण्यात, विशाखापट्टणमवरचा हल्ला परतवण्यात आणि पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

या कामगिरीचं नाव होतं ‘ऑपरेशन ट्रायडण्ट’. ही कामगिरी 4 डिसेंबरलाच यशस्वी झाली म्हणून आज म्हणजेच 4 डिसेंबरला ‘इंडियन नेव्ही डे’ साजरा केला जातो. भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे.

तसेच भारतीय नौदलाकडे 155 युद्धनौकांच्या तोफा आहे. तर नौदलाच्या हवाई शाखेत ध्रुव, चेतक, सी-किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स व सी-हॅरियर्स या लढाऊ विमानांच्या तुकड्या आहेत.

युद्धनौका बांधणी प्रकल्प

युद्धनौका बांधणीचा प्रकल्प देशातच हवा या अनुषंगाने माझगाव गोदी मध्ये इ.स. 1966 मध्ये लढाऊ जहाजाच्या बांधणीचे काम सुरू झाले. या माध्यमातून आजपर्यंत 80 युद्धनौकांची बांधणी करण्यात आली आहे.

आज नौदल दिन आहे. या निमित्ताने गेट वे ऑफ इंडियावर भारतीय नौदलाच्यावतीने विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्य़ात आलं आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी गेट वे ऑफ इंडियावर सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *