Wed. Jun 29th, 2022

हिंदी महासागराची तापमानवाढ

नवी दिल्ली: अन्य समुद्रांपेक्षा हिंदी महासागराची जलद गतीने तापमानवाढ होत असून येत्या काही दशकांत भारतात उष्णतेच्या लाटा येतील आणि पूरपरिस्थितीलाही तोंड द्यावे लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या जागतिक अहवालात सोमवारी देण्यात आला.

हिंदी महासागराची जलद गतीने तापमानवाढ होत असून येत्या काही दशकांत भारतात उष्णतेच्या लाटा येतील आणि पूरपरिस्थितीलाही तोंड द्यावे लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या जागतिक अहवालात सोमवारी देण्यात आला. पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने कोणकोणते जागतिक दुष्परिणाम संभवतील, याबाबतचा संयुक्त राष्ट्रांच्या इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज चा सहावा अहवाल ‘क्लायमेट चेंज २०२१ – प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भारताबद्दल गंभीर इशारा देण्यात आला आहे. हिंदूी महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल, असे या अहवालात म्हटले आहे.

भारतासारख्या देशांमध्ये वायूकणांच्या उत्सर्जनामुळे उष्णतेच्या लाटा निर्माण होतात. त्यामुळे वायूकणांचे उत्सर्जन कमी करणे हवेच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे आहे, उष्णतेच्या लाटांमध्ये वाढ होण्याबरोबरच, अतिवृष्टी आणि हिमनद्यांचे वितळणे हेही परिणाम भारतासारख्या देशाच्या बाबतीत संभवतात. समुद्राच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे उष्णकटिबंधीय चक्रीवादळे किनारपट्टय़ांवर पूरपरिस्थिती निर्माण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.