Fri. Apr 16th, 2021

तुर्कस्थानच्या कांद्यापेक्षा भारतीय कांदाच उच्च प्रतीचा

सध्या कांद्याची आवक वाढल्याने देशात विविध ठिकाणाहून कांद्याची निर्यात केली जात आहे. दरम्यान पिंपरी-चिंचवडमधील चाकण मार्केटमध्ये तुर्कस्थानचा कांदा दाखल झाला आहे.

यामुळे भारतीय कांद्याला 35 ते 40 रूपये किलो तर तुर्की कांद्याला 30 रूपये प्रतिकिलो इतका भाव मिळत आहे.

तुर्कस्थानचा कांदा आकाराने मोठा मात्र चवीला पाणचट,तसाच अत्यंत सुमार दर्जाचा आहे. यामुळे ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये तुर्की कांद्याबद्दल कुजबूज चालू असल्याचे चित्र सध्या चाकण मार्केटमध्ये दिसत आहे.

चाकण मार्केटमध्ये एक कंटेनर तुर्कस्तानच्या कांद्याची आवक झाली आहे. शासनाने कांद्याच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अन्य देशातून कांद्याची आयात करण्याचे धोरण अवलंबले होते. त्यामुळे भारतात आलेल्या तुर्कस्तानच्या कांद्याची खरेदी करून तो चाकण मार्केटमध्ये विक्रीसाठी आणण्यात आला आहे.

दरम्यान डाळिंबासारखा दिसणारा आकाराने मोठा असलेला हा कांदा चवीला मात्र अत्यंत सुमार दर्जाचा असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले. यामुळे चव आणि गुणवत्तेच्या बाबतीत भारतीय कांदाच अव्वल असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *