Mon. Jul 4th, 2022

रवीकुमार दहियाने पटकावले रौप्यपदक

भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहिया याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकून इतिहास घडवला. टोकियो ऑलिम्पिकमधील भारताचे हे दुसरे रौप्यपदक आहे. कुस्तीत फ्रीस्टाइलमध्ये ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत रशियाच्या झावूरने भारताच्या रवी कुमारचा पराभव केला. पहिल्या फेरीनंतर रवी कुमार ४-२ असा पिछाडीवर होता. झावूरने प्रत्येकी एक असे दोन गुण मिळवले. त्यानंतर रवीने दोन गुण मिळून बरोबरी केली. तर झावूरने पुन्हा दोन गुणांची कमाई केली. त्यानंतर झावूरने आणखी ३ गुण मिळवत आघाडी ७-२ अशी केली. अखेर झावूने रवी कुमारवर ७-४ असा विजय मिळवला.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं गोल्ड मेडल थोड्यात हुकलं. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कुस्तीच्या अंतिम लढतीत भारताच्या रवी कुमारने सिल्व्हर मेडल पटकावलं. यापूर्वी २०१९ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत या दोघांच्यात चुरशीची लढाई पाहायला मिळाली होती. यावेळीही रशियन पैलवानच भारी ठरला होता. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत रवि दाहियाला ६-४ असे पराभवाचा सामना करावा लागला होता. रवि दाहियाने २०२० आणि २०२१ मध्ये आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत गोल्डन कामगिरी नोंदवली होती. २०१८ मध्ये त्याने २३ वर्षांखालील चॅम्पियशिप स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.