Jaimaharashtra news

स्विस बँकेतील भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांच्या निधीत वाढ

भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांचा स्विस बँकांमध्ये थेट तसेच भारतातील शाखा आणि अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून गुंतलेला निधी २०२० अखेरपर्यंत २०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. गुरुवारी स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेकडून जाहीर झालेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती पुढे आली आहे.

दोन वर्षांच्या घसरणीच्या प्रवाहाच्या विपरीत २०२० मधील भारतीयांच्या स्विस बँकांतील एकूण निधीने मागील १३ वर्षांतील सर्वोच्च स्तर गाठला आहे. २०१९च्या अखेरीस ६,६२५ कोटी रुपये असणाऱ्या निधीत वर्षभराच्या कालावधीत तिपटीहून मोठी वाढ झाली आहे. रोखे अथवा तत्सम साधनांद्वारे भारतीयांच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली असली, तरी ठेवींच्या रूपातील भारतीयांचा पैसा मात्र घसरत आला आहे.

एकीकडे खासगी बँक खात्यात जमा केलेली रक्कम खाली येत असताना वित्तीय संस्था आणि कंपन्यांनी सिक्युरिटीज आणि इतर मार्गांनी बरीच रक्कम जमा केली आहे. त्यानंतर २०११, २०१३ आणि २०१७ वगळता भारतीयांनी स्विस बँकांमध्ये पैसे जमा करण्यात फारसा रस दाखविला नाही. मात्र २०२० मध्ये जेथे खासगी ग्राहकांच्या खात्यात भारतीय ठेवींमध्ये सुमारे ४००० कोटी रुपये होते, तर इतर बँकांमार्फत ३१०० कोटी रुपये जमा झाले. तसेच सर्वाधिक १३ हजार ५०० काेटी रुपये बाँड, सुरक्षा ठेव आणि इतर माध्यमांद्वारे गुंतविण्यात आले आहेत.

Exit mobile version