Tue. Oct 26th, 2021

Surgicalstrike2 : भारताचा पाकिस्तानात घुसून ‘जैश’च्या तळांवर हल्ला

१४ फेब्रुवारी झालेल्या पुलवामा हल्ल्याचा भारत बदला घेणार आणि जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज पहाटे ३:३० वाजता भारतीय हवाई दलाने मोठी कारवाई केली आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून जैश- ए- मोहम्मदच्या तळांवर हा हल्ला केल्याचे समोर आले आहे. जैश- ए- मोहम्मदच्या तळांवर १००० किलो वजनाचे बॉम्ब फेकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नेमका हल्ला कसा केला ?

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर पहाटे हल्ला केला.

भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी जैश-ए-मोहम्मदच्या १००० किलो वजानाचे बॉम्ब फेकले.

१२ मिराज विमानांनी पाक हद्दीत घुसून हा हल्ला केल्याचे समजते आहे.

या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे अल्फा ३ कंट्रोल रूम पूर्णपणे उद्धवस्त झाल्याचेही सांगण्यात येत आहे.

तसेच दहशतवादी तळही पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत.

बालाकोट, मुझफ्फराबाद आणि चाकोटी येथील जैश ए मोहम्मदचे तळ उद्धवस्त करण्यात आले आहे.

हा हल्ला भारतीय हवाई दलाच्या विमानांनी LOCचे उल्लंघन केल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख मेजर जनरल आसिफ गफूर यांनी लावला.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *