Sat. Jul 31st, 2021

देशातील पहिली इलेक्ट्रिक ST बस ‘शिवाई’ मुंबईत दाखल

देशातील पहिली इलेक्ट्रिक एसटी बस ‘शिवाई’ मुंबईत दाखल झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्य हस्ते या बसचं लोकार्पण झालंय. या बसमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर, पर्यावरण पूरक होण्यासोबतच खर्च अटोक्यात येणार आहे.

ST महामंडळाच्या ताफ्यात पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली आहे.

एकदा चार्ज केल्यानंतर कमीत कमी 300 किलोमीटरचा पल्ला गाठणार आहे.

या इलेक्ट्रिक बसमुळे प्रवाशांचा प्रवास सुखाचा होणार आहे.

दोन शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस धावण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे. तो महाराष्ट्राने सुरु केला आहे.

सुरुवातील ही बस बोरिवली ते स्वारगेट, त्यानंतर पुणे ते नाशिक, पुणे ते औरंगाबाद, पुणे ते कोल्हापूर या मार्गावर धावणार आहे.

एकूण दोन टप्प्यांत मिळून 150 बस दाखल होणार आहेत.

शिवाईची वैशिष्ट्ये

बसची लांबी 12 मीटर असून रुंदी 2.6 मीटर आहे. तर, उंची 3.6 मीटर

बस चालवण्यासाठी 322 किलो वॅट क्षमतेची लिथिअम आयर्न फॉस्फेटच्या बॅटरीचा वापर

बसची आसन क्षमता 43+1 इतकी, त्यात पूशबॅक स्वरुपाची आरामदायी आसनं

CCTV, VTS, प्रवाशांशी संपर्क साधण्यासाठी उद्घोषणा यंत्रणा

ही बस वातानुकुलीत असून 36 किलो वॅट क्षमतेची वातानुकुलीत यंत्रणा लावण्यात आली आहे.

ही बस एका चार्ज केल्यानंतर कमीत कमी 300 किमीचा पल्ला गाठणार आहे.

बसला चार्च होण्यासाठी 1-5 तासांचा कालावधी लागेल.

इलेक्ट्रीक बसमुळे प्रदूषणात घट होणार

शिवाईचा खर्च ‘शिवशाही’पेक्षा अधिक तर ‘शिवनेरी’पेक्षा कमी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *