Fri. Sep 30th, 2022

युद्धनौका आयएनएस विक्रांत चाचणीसाठी समुद्रात

भारताच्या ‘विक्रांत’ या सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौकेच्या सागरी चाचण्या सुरू करण्यात आल्या असून ही युद्धनौका संपूर्णपमे भारतीय बनावटीची आहे. युद्धनौका आय.एन. एस.विक्रांत चाचणीसाठी समुद्रात गेलं आहे.

 

या विमानवाहू युद्धनौकेच्या सागरी चाचण्या सुरू झाल्या असून भारत आता विमानवाहू युद्धनौका तयार करण्यात स्वयंपूर्ण असलेल्या निवडक देशांच्या पंक्तीत जाऊन बसला असल्याचं नौदलानं म्हटलं आहे. २०१३ सालापासून या युद्धनौकेच्या बांधणीचे काम सुरु होते. ही विमानवाहू युद्धनौका ४० हजार टन वजनाची आहे. यापूर्वी १९७१ साली भारत – पाक युद्धात उतरलेली युद्धनौका मूळ रशियन बनावटीची युद्धनौका होती.

विक्रांत युद्धनौका तयार करण्यासाठी २३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. भारतासाठी हा अभिमानाचा दिवस असून विक्रांतचा पुनरावतार आता सागरी चाचण्यांसाठी सिद्ध झाला आहे. आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाचे उद्दिष्ट साध्य करणारा हा उपक्रम असल्याचं नौदलाने म्हटलं आहे.
सध्या भारताकडे ‘विक्रमादित्य’ ही एकच विमानवाहू युद्धनौका आहे. भारतीय नौदल हिंदी महासागरातील चीनचे वाढते वर्चस्व रोखण्यासाठी प्रयत्नशील असून भारतीय नौदलासाठी हिंदी महासागर सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र आहे.

बेसिनच्या चाचणीत यशस्वी झाल्यानंतर आयएनएस विक्रांतला आता खोल समुद्रात चाचणीसाठी उतरवण्यात आले आहे. आयएनएस विक्रांतच्या या सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ती समुद्रात तैनात केली जाईल.

पंतप्रधान मोदींकडून नौदलाचे अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नौदलाचे अभिनंदन केले आहे. ‘भारतीय नौदलाच्या डिझाईन टीमने डिझाइन केलेले आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेलया ‘विक्रांत’ या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेने आज आपले पहिले समुद्री उड्डाण केले. मेक इन इंडियाचे एक अद्भुत उदाहरण ठेवल्याबद्दल भारतीय नौदल आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे ​​अभिनंदन’, असं ट्विट मोदी यांनी केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.