Tue. Dec 7th, 2021

भारताच्या ‘GSAT-11’चं यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती

भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असलेल्या GSAT-11 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. 5,854 वजन असणाऱ्या या उपग्रहाचे बुधवारी सकाळी युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून प्रक्षेपण करण्यात आले. हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, या उपग्रहामुळे देशातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत होईल.

याआधी वर्षाच्या सुरुवातील या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र तांत्रिक समस्यांमुळे भारतीय अवकाश केंद्राने एप्रिलमध्ये याची तपासणी पुन्हा करण्यासाठी फ्रेंच गुएना येथून परत मागवले होते. Gsat-6A च्या अपयशानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल महिन्याच्या जवळपास Gsat-6A अनियंत्रित झाला होता आणि 29 मार्चला प्रक्षेपण होताच त्याचा संपर्क तुटला होता.

GSAT-11 हा भारताचा सर्वात वजनदार उपग्रह असून, त्याचे सोलर पॅनल सुमारे 4 मीटर एवढे मोठे आहेत. कम्युनिकेशन उपग्रह असलेला GSAT-11 या उपग्रहामुळे भारतातील इंटरनेटची स्पीड वाढवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *