Wed. Jun 29th, 2022

भारताचा निर्यातीत ‘ऐतिहासिक’ विक्रम

भारताने निर्यातीत ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी ४०० अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य ठेवले होते. तर हे चालू आर्थिक वर्ष संपण्याच्या ९ दिवस आधीच भारताने निर्यात लक्ष्य साध्य केले आहे. कोरोनाकाळानंतर भारताची निर्यात सुस्साट झाली असून भारताने निर्यातीत विक्रम नोंदवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या या गौरवशाली कामगिरीचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘भारताने ४०० अब्ज डॉलरच्या निर्यातीचे लक्ष्य ठेवले आणि ते पूर्णही केले. भारताच्या यशाचे कौतुक करताना आत्मनिर्भर भारताच्या प्रवासाताली हा महत्त्वाचा टप्पा आहे. या यशाबद्दल मी शेतकरी, विणकर, उत्पादक, निर्यातदार यांचे अभिनंदन करत आहे.’

निर्यातीची आकडेवारी पुढीलप्रमाणे :

  • पेट्रोलियम – ३४.५४ टक्के
  • इलेक्ट्रॉनिक वस्तू – ३२.०४ टक्के
  • अभियांत्रिकी वस्तू – ३३.०१ टक्के
  • कापूस – २५.३८ टक्के
  • रसायने – १८.०२ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.