‘जलिकट्टू’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर

दक्षिणात्य चित्रपट ‘जलिकट्टू’ ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर झाला आहे. या पुरस्कार स्पर्धेसाठी देशभरातील २७ चित्रपटांची निवड करण्यात आली होती. ‘जलिकट्टू’ हा मल्याळम चित्रपट अधिकृतरित्या ऑस्करसाठी भारताकडून पाठवण्यात आला होता.
फिचर फिल्म या विभागात नामांकन मिळवण्यासाठी हा चित्रपट प्रयत्न करत होता. मात्र, आता त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. ऑस्कर हा सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. ‘जलिकट्टू’ हा चित्रपट ऑक्टोंबर २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात Antony Varghese, Chemban Vinod Jose, Santhy Balachandran, Jaffar Idukki यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे. या चित्रपटात पटकथा ही जलिकट्टू या खेळावर आधारित आहे.
‘फिल्म फेडरोशन ऑफ इंडिया’नं ऑस्कर स्पर्धेसाठी या ‘जलिकट्टू’ची निवड केली होती. भारताव्यतिरिक्त अमेरिका आणि युरोपमध्ये इंग्रजी भाषांतर करुन हा चित्रपट प्रदर्शित झाला होता .अनेक पाश्चात्य समिक्षकांनीही या चित्रपटाची प्रचंड स्तुती केली होती. मात्र हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीमधून बाहेर पडल्यावर अनेकांच्या अपेक्षा या भंग झाल्या आहे.