Sun. Jun 20th, 2021

नोटाबंदीमुळे भारतात बेरोजगारीचा दर वाढला

भारताचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या 45 वर्षांत सर्वाधिक असल्याचा अहवाल राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाकडून (NSSO) करण्यात आला आहे.

या कार्यालयाने केलेल्या नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षणातून (PLFS) ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार, भारतातील 2017-18 चा बेरोजगारीचा दर हा 6.1 टक्के इतका आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या हंगामी अध्यक्षांसह एका सदस्याने सोमवारी (दि.२८) दिलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल आला आहे.

नोटाबंदीनंतरची लक्षणीय रोजगार घट दर्शवणारा अहवाल रोखून धरल्याबद्दल राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या सदस्यांनी राजीनामे दिले होते.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या सर्वेक्षणाचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मात्र या अहवालानुसार 1972-73 पासूनच्या बेरोजगारीचा दर सध्या मोठ्या प्रामाणात आहे.

नोटाबंदीमुळे अनेक लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल जारी करणे महत्त्वाचे होते. त्यात सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे जे परिणाम झाले, त्यातील प्रतिकूल बाबींचा समावेश असल्याने हा अहवाल रोखून धरण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.

दरम्यान सरकारने यावरुन सारवासारव केली होती. या सदस्यांनी आमच्याकडे कधीही त्यांचे आक्षेप व्यक्तच केले नाहीत, अशी भूमिका सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून घेण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *