Jaimaharashtra news

भारतात जगातील सर्वात वेगवान लसीकरण

भारत हा जगातील सर्वाधिक वेगवान कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवणारा देश ठरला आहे. त्यानुसार, केवळ सहा दिवसांत भारतात १० लाख कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी ही माहिती दिली.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, “१० लाख जणांना आपण सहा दिवसांत लस दिली. अमेरिकेनं ती १० दिवसांत, स्पेननं १२ दिवसांत, इस्रायलनं १४ दिवसांत, युकेनं १८ दिवसांत, इटलीनं १९ दिवसांत, जर्मनीनं २० दिवसांत तर यासाठी युएईला २७ दिवस लागले होते.
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, काल दुपारी २ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतानं आजवर २५ लाखांहून अधिक लसीचे डोस दिले आहेत.

Exit mobile version