पाटण्यात इंडिगोच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या…

पाटणातील पुनाईचाक भागातील कुसुम विलास अपार्टमेंट येथे रात्री ७ वाजेच्या सुमारास विमानतळावर कार्यरत असलेल्या इंडिगो विमान कंपनीच्या मॅनेजरची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या व्यक्तीचं नाव रुपेश कुमार आहे. रुपेश कुमार विमानतळावरून घरी येत होते. त्याची कार कॉलनीच्या गेटजवळ येताच काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात रुपेश कुमार गंभीरपणे जखमी झाले होते. आरोपींनी कुमार यांच्या दिशेने तब्बल सहा राऊंड फायर केले. त्यानंतर आरोपी फरार झाले.
बेशुद्धावस्थेत असलेल्या रुपेश कुमार यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यानंतर विरोधी पक्षातील असलेले तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला असून त्यांनी ट्विट करून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “बिहारमध्ये दररोज होत असलेल्या खून, चोऱ्या, अपहरण आणि बलात्काराच्या शेकडो घटना भाजपाप्रणित नितीश कुमार सरकारची खास काम आहेत,” असा टोला लगावत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा,”अशी मागणी तेजस्वी यादव यांनी केली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील नितीश कुमार टीका केली आहे.