इंदोरीकर महाराजांची प्रकृती बिघडली

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांची प्रकृती बिघडली असून त्यांना डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. अशा आशयाचे पत्र निवृत्ती महाराज देशमुख यांनी प्रसिद्ध केलं आहे. इंदोरीकर महाराज यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे ३० मेपर्यंतचे सर्व कार्यक्मर रद्द करण्यात आले आहेत.
पत्रात काय म्हटलंय?
इंदोरीकर महाराज यांची प्रकृती बिघडल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती सांगितली आहे. तसेच त्यांचे ३० मेपर्यंत सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. वैद्यकिय उपचारानंतर बरा होऊन मी पूर्व नियोजित कार्यक्रमात पार पाडणार आहे. तसेच इच्छा असूनही कार्यक्रमास येऊ शकत नाही, त्यामुळे कार्यक्रमांच्या संयोजकांची, आयोजकांची गैरसोय होत असल्यामुळे त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करत आहे. असे प्रसिद्धी पत्रकात महाराजांनी म्हटलं आहे.