Sat. Oct 1st, 2022

किर्तनकार इंदोरीकर महाराजांचं वादग्रस्त विधान

इंदोरीकर महाराजांनी आपल्या किर्तनादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

नक्की काय म्हणाले इंदोरीकर ?

”सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते ” असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदोरीकर महाराजांनी केलं आहे. ओझर येथे झालेल्या किर्तनात त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  

इंदोरीकर महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येऊ शकते. गर्भलिंगनिदान निवडीबाबत जाहीरात करुन त्यांनी PCPNDT कायद्याच्या कलम २२ उल्लंघन केलं आहे, अशी प्रतिक्रिया या समितीच्या सदस्यांनी दिली आहे.

या वादग्रस्त वक्तव्यावरुन PCPNDT समिती इंदोरीकर महाराजांना नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांच्याकडे या वक्तव्याचं खुलासा मागणार आहेत.  

कीर्तनकार इंदोरीकर महाराज आपल्या किर्तनातून विविध विषयांवर भाष्य करतात. त्यांच्या किर्तनाच्या हटके स्टाईलमुळे ते तरुणाईत चांगलेच प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.

दरम्यान आता या प्रकरणी काय कारवाई होते, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.