Wed. Dec 8th, 2021

अंनिसच्या मागणीवरून अखेर कोल्हापुरातील इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम रद्द

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विरोधामुळे अखेर हभप इंदुरीकर महाराज यांचा कोल्हापुरातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आज संध्याकाळी कोल्हापुरात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्त्रीजातीचा अपमान करणाऱ्या इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम विद्यापीठात ठेवू नये, अशी मागणी अंनिसने शिवाजी विद्यापीठाकडे केली होती. तर हा कार्यक्रम व्हावा अशी मागणी हिंदु संघटनांनी केली. अखेर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. तरीही हा कार्यक्रम रद्द केलेला नसून तात्पुरता स्थगित करण्यात आल्याचं कार्यक्रमाच्या आयोजकांनी म्हटलं आहे.

मुलांच्या जन्मावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर अंनिस तसंच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई इंदुरीकर महाराजांविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. प्रकरण चिघळल्यावर उद्विग्न होऊन इंदुरीकर महाराजांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगीर व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही अंनिसने इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.  

PCPND समितीने इंदुरीकर महाराजांना क्लिन चिट दिली होती. त्यावर समितीने जाणीवपूर्क दिरंगाई केल्याचा आरोप अंनिसने केला आहे. तसंच 15 दिवसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. तसं न झाल्यास जिल्हा शल्य चिकित्सकांनवरच न्यायालयीन कारवाई करण्याचा इशारा अंनिसतर्फे देण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *