Mon. Aug 10th, 2020

अय्यर-पंतचे अर्धशतक, विंडिजला विजयासाठी 288 धावांचे आव्हान

चेन्नई : टीम इंडियाने विंडिजला विजयासाठी 288 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 287 धावा केल्या. टीम इंडियाकडून सर्वाधिक 71 धावा ऋषभ पंतने केल्या.

तर श्रेयस अय्यरने 70 रन करत पंतला चांगली साथ दिली. तर केदार जाधवने अखेरीस येऊन 40 धावांची उपयुक्त खेळी केली.

टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली राहिली नाही. टीम इंडियाने आपले पहिले दोन विकेट 7 व्या ओव्हरमध्ये गमावले. लोकेश राहुलच्या रुपात टीम इंडियाला पहिला धक्का लागला. त्याने 6 धावा केल्या. 7 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर राहुल कॅचआउट झाला.

तर 7 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली अवघ्या 4 रनवर बोल्ड झाला. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था 25 रनवर 2 विकेट अशी झाली होती.

विराट आऊट झाल्यानंतर आलेल्या पंतने रोहित शर्माला चांगली साथ दिली. या दोघांनी टीम इंडियाचा डाव सावरला. यांच्या दोघात तिसऱ्या विकेटसाठी 55 रनची पार्टनरशीप केली.

रोहित शर्माने चांगली झुंज दिली. मात्र रोहित 36 रनवर आऊट झाला. रोहितनंतर आलेल्या श्रेयस अय्यरने पंतच्या जोडीने टीम इंडियाच्या खेळीला आकार दिला.

या दोघांनी चांगली खेळी केली. या दोघांनी 114 धावांची शतकी भागीदारी केली. या दरम्यान दोघांनी आपले अर्धशतक देखील पू्र्ण केले. ही जोडी फोडण्यास अल्झारी जोसेफला यश आले. जोसेफने अय्यरला 70 धावांवर आऊट केले.

विंडिजकडून शेल्डन कॉट्रिएल, अलझारी जोसेफ आणि किमो पॉल या तिघांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *