Mon. May 17th, 2021

INDvsWI, 1st odi : वेस्ट इंडिजचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. आजचा पहिला सामना चेन्नईतील एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे.

वेस्ट इंडिजने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाला सलगपणे 10 वी द्विपक्षीय मालिका जिंकण्याची संधी या सीरिजनिमित्ताने असणार आहे.

या वनडे मालिकेआधीच टीम इंडियाच्या दोन खेळाडूंना वनडे सीरिजला मुकावे लागले आहे. टीममध्ये टॉप-15 मध्ये शिखर धवनऐवजी मयंक अगरवाल तर, भुवनेश्वर कुमार ऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे.

मयंकला संधी नाही

टीममध्ये शिखर धवनच्या जागी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. परंतु मयंकला विंडिज विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये संधी देण्यात आली नाही.

शिवम दुबेचं वनडे डेब्यू

टीम इंडियामध्ये मुंबईकर शिवम दुबेला संधी देण्यात आली आहे. वनडे क्रिकेटमधील शिवम दुबेची ही डेब्यु मॅच आहे. शिवम दुबेने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये तुफानी बॅटिंग केली होती. त्यामुळे शिवम दुबे आपल्या डेब्यूमध्ये कशी कामगिरी करतो याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

रोहित शर्मा, विराट कोहली, लोकेश राहुल, शिवम या खेळाडूंनी टी-20 मध्ये विंडिज विरुद्ध चांगली कामगिरी केली. टी-20 प्रमाणेच हे खेळाडू वनडेमध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी करतील, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींना असणार आहे.

टीम इंडियाच्या बॉलिंगची धुरा मोहम्मद शमी, दीपक चहर, रविंद्र जडेजा यासंह इतर बॉलरवर असणार आहे.

टीम इंडिया : रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली (कॅप्टन), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केदार जाधव, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, दीपक चहर आणि मोहम्मद शमी

वेस्ट इंडिज : शाय होप, सुनील अ‍ॅम्ब्रिस, शिम्रॉन हेटमायर, निकोलस पूरन, रोस्टन चेस, किरॉन पोलार्ड (कॅप्टन), जेसन होल्डर, कीमो पॉल, हेडन वॉल्श, अल्झारी जोसेफ आणि शेल्डन कॉट्रिएल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *