#INDvWI टी-20 मध्ये रोहितने रचला नवा विक्रम, विराटला टाकलं मागे

भारतविरुद्ध वेस्ट इंडिज दुसरा टी-20 सामना आज लखनऊ येथील मैदानावर आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला चांगलीच झुंज दिली होती. पण अखेर त्यांच्या पदरी निराशा आली. याचा वचपा काढण्यासाठी आज विंडीजचा संघ मैदानात उतरला आहे. तर आजचा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेण्याच्या तयारीत भारतीय संघ मैदानात उतरला आहे. पहिल्या सामन्यात रोहितला साजेशी कामगिरी करता आली नाही, पण दुसऱ्या सामन्यात रोहितने ही कसर भरून काढली.
टी-20 सामन्यांत भारताकडून सर्वाधिक धावांचा विक्रम विराटच्या नावावर आहे. विराटने 62 सामन्यांत 2102 धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी रोहित कोहलीपेक्षा 11 धावांनी पिछाडीवर होता. मात्र या सामन्यात 10 धावांवर असताना रोहितने षटकार लगावला आणि भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.