Sat. Jul 31st, 2021

#INDvsWI : भारताचा वेस्ट इंडिजवर 125 धावांनी दणदणीत विजय!

क्रिकेट वर्ल्ड कपच्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात  भारताने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला आहे. हा भारताचा विश्वचषकात पाचवा विजय आहे. यंदाच्या World Cup मध्ये भारत अजूनपर्यंत अपराजित राहिला आहे.

मँचेस्टरमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडीज असा सामना रंगला होता.

भारतानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

कर्णधार कोहली आणि धोनीच्या अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर 269 धावांचं आव्हान ठेवलं.

मात्र हे आव्हान वेस्ट इंडिजला पूर्ण करता आलं नाही आणि भारताचा वेस्ट इंडिजवर 125 धावांनी विजय झाला.

या सामन्यात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 20,000 धावा पूर्ण केल्या आहेत.

 

विराट कामगिरी! क्रिकेट करिअरमध्ये विराटने गाठला 20,000 रन्सचा टप्पा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *