Mon. May 17th, 2021

INDvsWI, Final : पोलार्ड-पूरनचा तडाखा, टीम इंडियाला विजयासाठी 316 धावांचे आव्हान

कॅप्टन किरॉन पोलार्ड आणि निकोलस पूरन यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर विंडिजने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 315 धावा केल्या आहेत.

त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 316 धावांचे आव्हान मिळाले आहे.

विंडिजकडून सर्वाधिक निकोलस पूरनने 89 धावा केल्या. तर कॅप्टन किरॉन पोलार्डने 74 धावा केल्या. तर इतर खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली.

टीम इंडियाने टॉस जिंकून विंडिजला बॅटिंगसाठी भाग पाडले. विंडिजची सुरुवात चांगली झाली. पहिल्या विकेटसाठी इव्हिन लुईस आणि शाय होपने 57 धावा जोडल्या.

ही जोडी नवदीप सैनीने मोडून काढली. नवदीपने इव्हिन लुईसला बाद केले. इव्हिन लुईस नवदीप सैनीचा पहिला बळी ठरला. यानंतर विंडिजला दुसरा धक्का 70 धावा असताना लागला.

शाय होप 42 धावा करुन बाद झाला. त्याला मोहम्मद शमीने बोल्ड केले.

शिमरॉन हेटमायर आणि रोस्टन चेस या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 धावांची पार्टनरशीप केली.

विंडिजची तिसरी विकेट 132 धावांवर गेली. यानंतर 12 धावानंतरच म्हणजेच 144 स्कोअर असताना विंडिजला चौथा धक्का लागला. रोस्टन चेस 38 धावांवर आऊट झाला.

यानंतर पाचव्या विकेटसाठी विंडिजकडून शतकी पार्टनरशीप झाली. निकोलस पूरन आणि किरॉन पोलार्ड या दोघांनी 135 धावांची शतकी पार्टनरशीप केली.

या दोघांनी टीम इंडियाच्या बॉलर्सचा चांगलाच समाचार घेतला.

अवघ्या 98 बॉलमध्ये या दोघांनी 5 व्या विकेटसाठी 135 धावा जोडल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *