Thu. Sep 16th, 2021

पुण्यात बांगलादेशींची घुसखोरी

पुण्यात बांग्लादेशींची घुसखोरी झाल्याचे समोर आले आहे . तसेच ते आधार आणि पॅनकार्डसोबत गेल्या दोन वर्षांपासून वास्तव करत असल्याचे समोर आले . १९९५ ते २०११ दरम्यान संशयित बांगलादेशी घुसखोरी करत पुण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले . पुण्यात आल्यावर त्यांनी आधार आणि पॅन कार्ड बनवून घेतले. पोलिसांनी संशयितांचं बांगलादेशी नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अद्याप कोणतीही कागदपत्रे जप्त केलेली नाहीत. त्यामुळे अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या माहितीच्या आधारे, बेकायदेशीरपणे भारतात स्थलांतरित झालेल्या आणि सध्या पुण्याच्या हडपसर भागात राहणाऱ्या संशयित सात व्यक्तींना नुकतीच चौकशीसाठी हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलावर मंडल, एसए शेख, फारुख शेख, एनआर शेख, कामरुल मंडल, मुनीर शेख, हुमायूं शेख अशी या लोकांची नावं आहेत. या व्यक्तींनी चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की ते बांगलादेशी आहेत. ते लोक १९९५, २००२, २००७, २००८ आणि २०११ मध्ये कोलकाता मार्गे भारतात आले आणि पुण्यात पोहोचले. हे लोक सध्या मंतरवाडी कचरा डेपोमध्ये रॅग पिकर्स म्हणून काम करत आहेत. पुण्यात आल्यानंतर त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड अशी भारतीय कागदपत्रे खरेदी केल्याचेही पोलीस चौकशीत उघड झाले. “ते बांगलादेशचे नागरिक असल्याचे कोणतेही कागदपत्र जप्त करण्यात आले नाही. त्यामुळे ते बांगलादेशचे आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट नाही,” असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *