Sun. Jun 16th, 2019

…आणि बाळासाहेबांच्या ‘या’ वक्तव्यामुळे दहशतवादी घाबरले

0Shares

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांचं मराठी माणसासाठी असलेलं योगदान हे कधीच न विसरण्यासारखं आहे. आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त जाणून घ्या त्यांच्याबाबतच्या या विशेष गोष्टी जे विरोधकांना उघडपणे धमकी द्यायचे, जे मुंबईला देशाची राजधानी बनवू इच्छित होते, ज्यांच्या दरबारात विरोधक देखील सहभागी व्हायचे. असं बेधडक बिनधास्त व्यक्तीमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे.

बाळासाहेब ठाकरे यांचे बालपणीचे नाव बाळ केशव ठाकरे होते. पुढे बाळासाहेब ठाकरे या नावाने त्यांची ओळख निर्माण झाली.

बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते नंतर ते राजकारणी बनले. बाळासाहेब हे एक लोकप्रिय क्रांतिकारक व्यंगचित्रकार होते. 1950 च्या सुमारास टाइम्स ऑफ इंडियाच्या रविवारच्या आवृत्तीत त्यांच्येच रेखाटलेले व्यंगचित्रे छापले जाई. सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. 1950 मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यासोबतही काही काळ काम केले. ‘फ्री प्रेस जर्नल’मध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे-व्यंगचित्रे-जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत. मात्र 1960मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली.

बाळासाहेब ठाकरेंना ‘हिंदूहृदय सम्राट’ म्हटले जायचे. त्यांची भाषणं ऐकण्यासाठी लाखो लोक एकत्रित व्हायचे.

19 जून, 1966 रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कमधे नारळ फोडून आपल्या मित्रांसह “शिवसेना” हा पक्ष तयार केला.

बाळासाहेब ठाकरे यांची विशेष गोष्ट म्हणजे ते कधीही कोणाला भेटले नाहीत. ज्यांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे त्यांनी घरी यावे, असे त्यांचे मत होते. भारतातील सर्व दिग्गज नेते आणि कलाकार त्यांना भेटण्यासाठी मुंबईतील त्यांच्या ‘मोतीश्री’ या घरी यायचे.

1990 या काळात, काश्मीर मधील इस्लामी दहशतवाद्यांनी कश्मिरी पंडितांना तिथून हकलावायला लावले होते. त्यावेळी अमरनाथ यात्रा सुरू होती. दहशतवाद्यांनी ती अमरनाथ यात्रा थांबविण्याची धमकी दिली होती. दहशतवाद्यांनी अशी धमकी दिली होती की जो कोणी या यात्रेसाठी येईल तो परत घरी जाणार नाही. तेव्हा बाळासाहेबांनी असे निवेदन केले की, 99% हज यात्रेकडे जाणाऱ्या फ्लाइट मुंबई विमानतळावरून जातात. मक्का-मदीनाला येथून प्रवास कसा केला जातो बघूया. आणि त्यांच्या या बेधडक वक्तव्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमरनाथ यात्रा सुरू झाली.

बाळासाहेब ठाकरे यांचे काही विशेष छंद होते. जसे की सिगार, वाईन इ. त्यांच्या बहुतेक फोटो किंवा मुलाखातीमध्ये त्यांच्या हातात पाईप किंवा सिगार असायचे. 1995 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांनी पाईपची सवय तर सोडली परंतु सिगारची सवय ही मृत्यू नंतरच सुटली.

1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यावर 6 वर्षे निवडणूक लढवण्याची बंदी आणली गेली होती परंतु बाळासाहेबांनी आपल्या आयुष्यात कधीही निवडणूक लढवली नाही.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात भरपूर दुःखं देखील होती. आधी त्यांच्या पत्नीचा मृत्यू नंतर मोठा मुलगा बिंदूमाधव यांचे कार अपघातात निधन नंतर दुसरा मुलगा जयदेव यांच्या बरोबर मतभेद आणि आपला लाडका भाचा राज ठाकरे याचा नवीन पक्ष तयार करणे. राज ठाकरे यांना बाळासाहेबांचे उत्तराधिकारी असेही मानले जायचे.

अशा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशाच्या राजकारणात मराठी आणि हिंदुत्ववादाचा ‘भगवा’ सतत फडकवत ठेवला. आणि बाळासाहेब ठाकरे हे व्यक्तीमत्व आजही हिंदुहृदयसम्राट म्हणून आजही मराठी माणसाच्या मनात जिवंत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *