Mon. Jan 24th, 2022

पोटच्या मुलाला बापाकडून अमानुष मारहाण; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

नाशिकमधील कौटुंबिक हिंसाचाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये वडिल आपल्या पोटच्या मुलाला अमानुषपणे मारहाण करत असल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये मुलावर अमानुष मारहाण केल्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकाच्या मनाला पाझर फुटणारा आहे. बापाने आपल्या पोटच्याच मुलाला मारहाण केल्यामुळे या व्हिडिओचा राज्यात संताप व्यक्त होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बापाने आपल्या पोटच्या मुलाला अमानुष मारहाण केली. या हैवान बापाने या मारहाणीचा व्हिडिओ स्वतःच्या मुलीला रेकॉर्ड करायला सांगितला. ही मारहाण इतकी अमानुष आहे की मारता मारता या बापाच्या हातातील काठी तुटते तरी बाप या मुलाला मारायचे काही थांबवत नाही. मोबाईलमध्ये शूटिंग काढणारी मुलगीसुद्धा अगदी केविलवाणे ‘मारू नका, मारू नका’ अशी विनवणी करते आहे. मात्र हा हैवान बाप काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून अगदी सर्वसामान्याच्या डोक्यात मुंग्या जातील अशा पद्धतीची ही मारहाण आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओमधील दिसणाऱ्या सैतान बापाला शोधून चांगला धडा शिकवा, अशी संतप्त भावना जनसामान्यातून उमटत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *