Tue. Jun 15th, 2021

सलामीवीर शिखर धवन जायबंदी, #CWC19 मधून बाहेर!

इंग्लंडमध्ये सध्या सुरू असलेल्या Cricket World Cup मध्ये Team India ची कामगिरी दमदार आहे. मात्र अशातच टीम इंडियाला मैदानाबाहेर धक्का बसलाय. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन याला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर जावं लागलंय. सामन्यात झालेल्या दुखापतीमुळे शिखर धवनला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.

शिखर धवन स्पर्धेतून बाहेर!

शिखर धवन याच्या अंगठयाला दुखापत झाली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये धवनने शतक केलं होतं.

मात्र त्याचवेळी त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.

तो fielding साठी त्या मॅचमध्ये उतरला नव्हता.

याच दुखापतीमुळे आता आगामी सामन्यांना शिखर धवन मुकणार आहे.

धवनला 3 आठवड्यांसाठी विश्रांतीचा सल्ला देण्यात आलाय.

धवनच्या ऐवजी आता ऋषभ पंतला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाचे व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांनी शिखर धवनला झालेल्या दुखापतीबद्दल वक्तव्य केलं आहे.

धवनच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली असून बोटाला फ्रॅक्चर झालं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

पुढील पंधरा दिवसांत तरी त्याची दुखापत पूर्ण बरी होणं शक्य नाही.

त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतील पुढील सामन्यांमधून त्याला माघार घ्यावी लागत आहे.

शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला 15 खेळाडूंच्या संघात स्थान मिळावं यासाठी आम्ही विनंती केलं असल्याचं त्यांनी सांगितलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *