तुम्ही चाखलाय का ‘गुलाबजाम-पाव’?

मुंबईचा वडापाव हा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झालेला पदार्थ आहे. वडापाव पाठोपाठ समोसा पाव, मिसळ पाव, भजी पाव, बैदा पाव, पाया पाव असे झणझणीत मसालेदार पदार्थ खवय्यांचे लाडके आहेत. मात्र याबरोबरीने आणखी एक पदार्थ पावासोबत जोडी जमवून खवय्यांना आस्वाद द्यायला दाखल झालाय. मात्र हा पदार्थ खवय्यांच्या मात्र टवीला अजिबात उतरलेला नाही. हा पदार्थ म्हणजे ‘गुलाबजाम पाव’. साखरेच्या पाकात भिजलेला खव्याचे गोड गुलाबजाम हा पदार्थ प्रसिद्ध होण्याऐवजी कुप्रसिद्धच जास्त झाला आहे. कारण खवय्यांना हा पदार्थ अजिबातच पसंत पडला नाही.
अनेकांनी तर या पदार्थाकडे ढुंकुनही पाहिलं नाही. उलट नेटवर जेव्हा या पदार्थाबद्दल जाहिरात करण्याचा प्रयत्न झाला तेव्हाच अनेकांनी तो हाणून पाडला. अनेकांनी हा पदार्थ चाखला नाहीच, उलट या कल्पनेनेही उलटीसारखं झाल्याचं म्हटलं. नेटकऱ्यांनी उलट हा पदार्थ म्हणजे वडापावचा अपमान असल्याची टीका केली आहे. असे पदार्थ तयार करणं हाच गुन्हा असल्याचं अतिरंजित विधानंही लोकांनी केली.
गुलाबजाम हा एकवेळ आईस्क्रीम, रबडी यांसारख्या पदार्थांसोबत लज्जतदार लागतो. पण पावात भजी, वड्याप्रमाणे गुलाबजाम घालून कुणी खातं का? असा सवाल खाद्यप्रेमींनी विचारत या पदार्थालाच टाटा-बायबाय केलंय.