तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची चौकशी

राज्यात तत्कालीन भाजपा सरकार असताना राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पुण्याचे तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांची पुणे पोलिसांकडून दोन दिवस चौकशी करण्यात आली आहे. तत्कालीन पोलीस उपायुक्त पंकज डहाणे सध्या नागपूर येथे एस. आर. पी. एफ. चे कमांडर आहेत.
माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला या पुणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांच्यासोबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे कार्यरत होते. त्यामुळे पंकज डहाणे यांची पुणे पोलिसांनी दोन दिवस चौकशी करत जबाब नोंदवून घेतला आहे.
राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्यावरून माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रश्मी शुक्ला यांना त्यांच्या कार्यकाळात नाना पटोले, बच्चू कडू, आशिष शेलार यांच्यासह पुण्याचे संजय काकडे यांचा फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.