Tue. Jun 18th, 2019

आयएनएस अरिहंत : शत्रूला खुलं आव्हान!

0Shares

अण्विक पाणबुडी INS अरिहंत टेहळणीचं काम करून परतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अण्विक पाणबुडीच्या टीमला भेट दिली. या पाणबुडीच्या कर्मचारी वर्गालाही संबोधित पंतप्रधानांनी यावेळी संबोधित केलं.

अशी सुसज्ज अण्विक पाणबुडी भारताकडे असणं ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचं पंतप्रधानांना म्हटलं आहे. आजघडीला देशाने आण्विक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असणं गरजेचं आहे. तसंच जे देश आण्विक हल्ल्याची भीती दाखवून जगाला ब्लॅकमेल करत आहेत, त्यांच्यासाठी आयएनएस अरिहंत हे प्रत्युत्तर असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं.

ज्या देशांना पाणबुडी बनवण्याचं तंत्रज्ञान अवगत आहे, अशा देशांच्या यादीत आता भारताचा समावेश झाला आहे.

‘जगातील शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी आयएनएस अरिहंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. तसेच आयएनएस अरिहंत हे राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्याच्या दृष्टीने एक प्रमुख पाऊल आहे. हे शत्रू देशांसाठी खुलं आव्हान आहे.’असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.

आतापर्यंत अमेरिका , रशिया, फ्रान्स , चीन आणि इंग्लंड यांच्याकडे पाणबुडीतून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची मारा करण्याची क्षमता आहे. रेल्वे आणि रस्त्यांवरून वहनक्षमता असलेली अग्नी क्षेपणास्रे आणि सुखोई ३० एमकेआयसारखी लढाऊ विमाने आपल्याकडे आहेत. त्यांमधून आण्विक मारा करता येतो. संरक्षण दलांमध्ये त्यांचा समावेशही झाला आहे. 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *