Sat. May 30th, 2020

आता Instagramवर करता येणार शॉपिंग, नवीन फीचर लाँच!

Facebook, Whatsappसह सोशल मीडियात लोकप्रिय असणारे Instagram आता ई-कॉमर्समध्ये उतरले आहे.

कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी Instagramवर निवडक ब्रँडच्या उत्पादनाची खरेदी करण्याची सुविधा आणली आहे.

मंगळवारी अमेरिकेत प्रायोगिक तत्वावर याची सुरुवात करण्यात आली आहे. इन्स्टाग्राम अॅपमध्ये नवीन फीचर आणलं आहे. या फीचरच्या माध्यमातून ग्राहकांना खरेदीची सुविधा देण्यात आली आहे.

Instagram ही Facebookचीच एक कंपनी आहे. या कंपनीनं एक ऑनलाइन पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही Instagramवर उत्पादने खरेदी करण्याची सुविधा देत आहेत.

जर तुम्हाला काही उत्पादने आवडली असतील, तर Instagram अॅपच्या माध्यमातून खरेदी करु शकता.

‘ याचबरोबर, Instagram अॅपमध्ये चेकआऊट बटनवर क्लिक केल्यानंतर उत्पादनांची संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळणार आहे.

ग्राहक यामधून आपल्या आवडीची उत्पादने खरेदी करु शकतात, असं कंपनीनं म्हटलं आहे.

दरम्यान, आजच्या इंटरनेटच्या जगात खूप काही बदलले आहे. ई-कॉमर्स कंपन्यामुळे सगळ्या गोष्टी घर बसल्या हातात मिळू लागल्या आहेत.

त्यात ऑनलाइन खरेदीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ईबे, फ्लिपकार्ट, अॅमेझोन यासारख्या ई-कॉमर्स कंपन्या नेटिझन्समध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *