Sun. May 16th, 2021

आता Instagramवर अश्लील फोटो दिसणार ब्लर!

तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्रामने एक नवे फीचर आणले आहे.

‘Sensitivity Screen Feature’ असे या फीचरचे नाव आहे.

इन्स्टाग्रामने हे फीचर नुकतेच लाँच केले असून या फीचरमुळे अश्लील फोटो, व्हिडिओ, थंबनेल्स क्लिक करेंपर्यंत ब्लर दिसतील.

युजरने क्लिक केल्यानंतर मात्र ते स्पष्टपणे दिसतील. अश्लील, वादग्रस्त कमेंट्सला आळा घालण्यासाठी इन्स्टाग्रामने हे पाऊल उचलले आहे.

वोग डॉट को डॉट यूकेच्या अहवालानुसार, भारतात इन्स्टाग्राम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हे फीचर आहे.

इन्स्टाग्रामवर अनेकदा अश्लील फोटो, सर्च, रिकमेंड किंवा सर्च केल्यानंतर अचानक अश्लील फोटो किंवा व्हिडिओ नजरेसमोर येतो.

अल्पवयीन मुला-मुलींना यापासून अलिप्त राहता यावे यासाठी हे फीचर उपयोगी ठरणार आहे.

इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मुसेरी यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती.

आत्महत्येला प्रवृत्त करणारा मजकूर वाचल्याने आपल्या मुलीने आत्महत्या केली होती, असा आरोप आत्महत्या केलेल्या मुलीच्या पालकांनी केला होता.

Social Mediaवर तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी हव्या त्या उपाययोजना कराव्यात, असा आदेश इंग्लंडचे आरोग्य सचिव मॅट हँकॉक यांनी Social Media कंपन्यांना दिला होता.

त्यानंतर इन्स्टाग्राममध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *