Sat. Jul 2nd, 2022

विरोधकांनी टीका न करता मदतकार्यात सहभागी व्हावं – गिरीश महाजन

मुसळधार पावसामुळे कोल्हापूर आणि सांगलीत पूरस्थिती झाली असून नागरिकांना वाचवण्यासाठी बचावकार्य मोहीम सुरू आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पुराची पाहणी करतानाचा सेल्फी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे विरोधकांनी गिरीश महाजनांवर प्रचंड टीका केली. गिरीश महाजन यांनी एक नवीन व्हिडीओ शेअर केला असून विरोधाकांचे ट्रोल करुन झाले असेल तर बचावकार्यासाठी मदत करावी असा टोला लगावला आहे.

गिरीश महाजनांचे विरोधकांना उत्तर –

विरोधकांनी गिरीश महाजनांवर टीका केल्यानंतर बचावकार्यावेळी मदत करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

सांगलीच्या पूरग्रस्त भागांमध्ये कुठलीही मदत पोहोचली नव्हती.

भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांसोबत आपत्तीग्रस्तांपर्यंत पोहोचलो असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे.

या बचावकार्यात गिरीश महाजन मदत करताना दिसत आहे.

तसेच मदतकार्याचे राजकारण करणारे विरोधकांनी घरात बसून टीका करण्याऐवजी घटनास्थळी येऊन मदत करवी असेही ट्विट करत म्हटलं.

&

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.