Thu. Jul 16th, 2020

खुशखबर! बँकांकडून कर्जांवरील व्याजदर घटवण्यास सुरुवात!

रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये सलद चौथ्यांदा कपात केल्यानंतर प्रामुख्याने सरकारी बँकांनी आपल्या कर्जांवरील व्याजदर घटवण्यास सुरुवात केली आहे. HDFC बँक या खासगी बँकेनंतर बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, IDBI बँक, आंध्र बँक या बँकांनी MCLR आधारित व्याजदर कमी केले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्रने कर्जावरील व्याजदर 0.10 टक्क्यांनी कमी केला आहे. यामुळे महाबँकेचा तीन व सहा महिने कालावधीच्या एमसीएलआर अनुक्रमे 8.3 व 8.4 टक्के झाला आहे. हे नवे दर 8 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत.

IDBI बँकेने विविध कालावधींच्या MCLR मध्ये 0.05 ते 0.15 टक्क्यांची कपात केली आहे.

यामुळे या बँकेच्या 6 महिने, 1 वर्ष व तीन वर्षे मुदतीच्या कर्जांवरील व्याजदर अनुक्रमे 8.5, 8.85 आणि 9.1 टक्क्यांनी कमी झाला आहे.

कॅनरा बँकेने सर्व मुदतीच्या कर्जांच्या MCLR मध्ये 0.10 टक्क्यांनी कपात केली आहे.

यामुळे या बँकेचा एक वर्ष मुदतीचा MCLR 8.5 टक्के झाला आहे.

आंध्र बँकेने एक वर्षापर्यंत मुदतीच्या कर्जांवरील MCLRमध्ये 0.25 टक्क्यांची घसघशीत कपात केली असून त्यामुळे या बँकेचा MCLR 7.95 टक्क्यांवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *