Fri. Oct 7th, 2022

आमदार बच्चू कडू यांना अंतरिम जामीन मंजूर

राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीनं कोठडी मिळालेल्या आमदार बच्चू कडू यांना सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर कडू यांनी समाधान व्यक्त केलं आहे. कोर्टाने १५ हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर बच्चू कडू यांचा जामीन मंजूर केला.

प्रिन्सिपल न्यायालयाकडून ५४ नंबर कोर्टामध्ये मेन्शनिंग करण्याचे निर्देश दिले गेले. यावेळी न्यायाधीश राहुल रोकडे यांनी बच्चू कडू यांच्या लीगल टीमला धारेवर धरले.तु मच्या चुकांमुळे आमचं टेन्शन वाढते. अखेर कोर्टाने बच्चू कडू यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २१ सप्टेंबरला होईल, असं कोर्टाने जाहीर केलं.

३० मार्च २०१६ रोजी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता, ३० मार्च २०१६ला दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते.

सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता, मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मंत्रालयातील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तेव्हा सरकारी अधिकारी संघटनांनी दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.