Mon. May 10th, 2021

62 वर्षे मूकबधीराचं सोंग घेऊन त्यानं टिकवला संसार!… काय आहे वास्तव?

‘लव्ह-मॅरेज असो किंवा अरेंज-मॅरेज, भाड्यांला भांडं लागलं की आवाज तर होतोच. ही घरोघरीची कहाणी आहे. पण बायकोच्या भांडण्याचा किंवा बोलण्याचा त्रास सहन करावा लागू नये. म्हणून अमेरिकेतील एका पतीने चक्क मुकबधीर असल्याचं  सोंग केलं. ते ही चक्क 62 वर्षं… अखेर 62 वर्षांनी त्याचं बिंग फुटलंच.’ अशी बातमी सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. मात्र  त्यामागचं वास्तव काही वेगळंच असल्याची माहिती ‘जय महाराष्ट्र’ला मिळाली आहे.

World News Daily Report ने यासंदर्भात बातमी दिली होती. मात्र त्या बातमीखालीच वेबसाइटने disclaimer देऊन ही बातमी गंमत म्हणून दिली असल्याची कबुली दिली आहे.

 

मात्र बातमीखाली disclaimer देऊन ही बातमी गंमत असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

The DISCLAIMER Read: “World News Daily Report assumes all responsibility for the satirical nature of its articles and for the fictional nature of their content. All characters appearing in the articles in this website – even those based on real people – are entirely fictional and any resemblance between them and any person, living, dead or undead, is purely a miracle.”

म्हणजेच ही बातमी खोटी असल्याचं त्यांनी स्वतःच मान्य केलंय.

नेमकी काय आहे ही बातमी?

बेरी आणि डोरथी हे जोडपं अमेरिकेतील एका शहरात राहत होतं.

बेरी यांच्या पत्नी खूप बडबड्या होत्या.

गंमत म्हणजे 84 वर्षीय पती आपल्या 80 वर्षीय पत्नीला चक्क 62 वर्षे उल्लू बनवत राहिले.

आपला नवरा मुकबधिर असल्याचं मानून डोरथी यांनी 2 वर्ष मेहनत घेऊन सांकेतिक भाषाही शिकली होती.

पत्नीच नव्हे तर मुलांना आणि नातवांनाही बेरी मुकबधिरच आहेत, असं वाटत होतं.

मात्र एका कॅरेओके कार्यक्रमात त्याचं हे बिंग फुटलं.

या गोष्टीमुळे सगळ्या कुटुंबाला जबरदस्त धक्का बसला.

अखेर वयाच्या या टप्पावर पत्नीने घटस्फोटाची मागणी केली आहे.

बेरीनं 62 वर्षे मुकबधिराचं सोंग घेऊन माझा विश्वासघात केला.

नवऱ्याने 62 वर्षे खोटं बोलून केवळ माझीच नाही, तर सगळ्या कुटुंबाची फसवणूक  केली.

याबाबत अतिशय वाईट वाटत असल्याचं डोरथीनं सांगितलं.

मात्र बेरींनी मुकबधिराचं सोंग केलं नसतं, तर या दोघांचा संसार 60 वर्षांआधीच मोडला असता, असं सांगून बेरीच्या वकिलांनी बेरी यांचं समर्थन केलं.

पण डोरभी यांचा निर्णय पक्का असून त्यांनी बेरीकडून झालेल्या मानसिक त्रासाबद्धल नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

या पती-पत्नीच्या भांडणाची कथा चर्चेचा विषय बनला असल्याचं या बातमीमध्ये म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *