‘संपूर्ण जगाला कोरोनाची लस मिळेपर्यंत शांत बसणार नाही’; टेड्रोस घेब्रायसस

जगात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे अनेक देश कोरोनाची लसीसाठी संशोधन करत आहे. नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रायसस यांनी वक्तव्य केलं. चीनमध्ये कोरोनाचा विषाणू सापडल्याचे वैज्ञानिकांनी सर्वात प्रथम जागतिक आरोग्य संघटनेला सांगितले होते. या घटनेची वर्षपूर्ती झाली. त्या निमित्ताने आयोजित केलेल्या परिषदेत डब्ल्यूएचओचे महासंचालक बोलत होते.
एक वर्षाच्या आत कोरोनावरील लस तयार होऊन जगभरात पुरवठाही सुरू झाला आहे. ही खुप मोठी वैज्ञानिकांनी कामगिरी केली असल्याचं टेड्रोस घेब्रायसस म्हणाले. मात्र, जोपर्यंत सर्व देशांना लस मिळत नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे ते म्हणाले. कोरोना विषाणूवर मात मिळवत असताना आणखी एक चिंतादायक बातमी समोर आली आहे. ब्रिटनवरून प्रवास करून भारतात आलेल्या सहा प्रवांशांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्याचं चाचणीत स्पष्ट झाले आहे. बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद शहरातील प्रयोगशाळेत सहा जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रवाशांचे तीन नमुने बंगळुरुमधील NIMHANS या प्रयोगशाळेत पाठविले असून हैदराबादमधील सेंटर फॉर सेल्युलस अॅन्ड मॉलॅक्युलर बायोलाजी प्रयोगशाळेत दोन नमुने आणि पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी प्रयोगशाळेत तपाणीसाठी पाठवले आहे. शिवाय एक नमुन्यात नव्या कोरोनाचे विषाणू सापडले आहेत. या सर्व सहा रुग्णांना सरकारी आरोग्य सुविधेत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच संपर्कात आलेल्या आणखी व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे.