Sun. Oct 24th, 2021

#InternationalWomensDay: गुगलने साकारल खास डुडल

जागतिक महिला दिन जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी उत्साहात हा दिवस साजरा केला जात आहे.अनेक स्तरातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सर्वत्र महिलांचा विशेष गौरव होत आहे.  सर्च इंजिन गुगल तरी यामध्ये कसं मागे पडेल.

महिला दिनाचे औचित्य साधून एक विशेष डुडल बनवून महिलांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

गुगलं नेहमीचं आपल्या डुडलद्वारे विशेष व्यक्तींचा सन्मान करत असतं.पण आजचं डुडल महिलांना सन्मान देणारं डुडल आज साकारण्यात आलं आहे.

देशात आदर्श ठरणाऱ्या महिलांना एका डिझाईनमध्ये बसवण्यात आलेलं आहे.

असं आहे गुगलचं खास डुडल

डुडलमध्ये १४ भाषांमधून महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत.

गुगलने बनवलेल्या खास डुडलला क्लिक केल्यानंतर जगभरातील वेगवेगवळ्या भाषांमधील कोट्स दिसू लागतात.

या डुडलला कोट्स देणाऱ्या महिलांची नाव सुद्धा या डुडलवर वाचता येत आहेत.

भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कॉमच्या नावाचाही समावेश आहे.

मेरी कॉमने या कोट्समध्ये लिहिलेय की, ‘तुम्ही एक महिला आहात म्हणून तुम्ही स्वःताला कमकुवत समजू नका’.

या डुडल स्लाइडला सोशल मीडियावर शेअर करण्याचा पर्याय सुद्धा मेरी कॉमने दिला आहे.

जगभरातील प्रतिभावंत महिलांचा एक समूह डिझाईन या प्रेरणादायक कोट्समध्ये करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *