Fri. Sep 30th, 2022

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने योगाची सुरुवात करणाऱ्यांसाठी ५ सर्वोत्कृष्ट आसने आणि त्यांचे फायदे

आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. योगाचे मूळ हजारो वर्षांपूर्वीचे मानले जात आहे. योगाचा सतत सराव आणि अभ्यास केल्यानंतर शरीर या आसनांसाठी अनुकूल होते. योगाची सुरुवात काही सोप्या आसनांद्वारे करुन हळूहळू याची व्याप्ती वाढवता येते.

पहिले आसन –
अधोमुख श्वानासन हे एक उत्तम आसन आहे. योगासनांच्या सुरुवातीला नवीन शिकणार्यांना या आसनाचा सराव करण्यास सांगितले जाते. या आसनाचा अभ्यास केल्यास शरीरात ऊर्जा येत, तणाव राहत नाही. हे आसन करणार्‍या लोकांना चिंता, तणाव आणि निद्रानाश सारख्या समस्या उद्भवत नाही.

दुसरे आसन –
वृक्षासन हे नव्याने योगासने शिकणाऱ्या सर्वांसाठी चांगलं आसन आहे. हे आसन एखाद्या व्यक्तीला संतुलन राखण्यासाठी आणि लक्ष केंद्रीत करण्यासाठी मदत करते. यात सहजपणे उभे राहुन मग शरीराचे एका पायावर संतुलन करावे लागते. याद्वारे, योगी श्वास संतुलित करण्यास देखील शिकतो आणि यामुळे शरीर मजबूत होण्यास मदत होते.

तिसरे आसन –
जे योगाभ्यास करण्यास प्रारंभ करतात त्यांच्यासाठी पश्चिमोत्तानासन खूप महत्वाचे आहे. पश्चिमोत्तानासन केल्याने पाठीच्या खालच्या भागात आणि वरच्या भागामध्ये एक स्ट्रेच मिळतो. हे आसन बसून, पुढे झुकून केले जाते.

चौथे आसन –
सेतू बंधासन शरीराला मागच्या बाजूला वाकवून केले जाते. हे अधोमुख श्वानासनाच्या विरुद्ध आहे. कारण शरीर पुढे टेकवून अधोमुख आसन केले जाते. योगाचा सराव सुरू करणाऱ्या लोकांसाठी हे सर्वोत्तम आसन मानला जाते.

पाचवे आसन –
बालासन आसन प्रत्येकासाठी खूप महत्वाचे मानले जाते. हे सोप्पा योग करणाऱ्यांसाठी विश्रांतीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि शरीराचा थकवा दूर करण्यासाठी मदत करते. हे आसन योग करणाऱ्या सर्व लोकांसाठी चांगलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.