Wed. May 12th, 2021

भारतात इंटरनेट सेवा सर्वात स्वस्त

स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे आपले जीवन वेगवान झाले आहे. भारतात स्मार्टफोनचा वापर जास्त प्रमाणात होत असून एका वेबसाईटने केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत जगात स्मार्टफोन वापरण्यात आघाडीवर आहे. स्मार्टफोन वापरण्यात चीनंतर भारत हा जगातील दुसरा मोठा देश आहे. भारतात सर्वात स्वस्त इंटरनेटचे दर असल्याचे या वेबसाईटने आपल्या सर्वेक्षणातून स्पष्ट केले आहे. भारतात ग्राहकांना एका जीबीकरिता फक्त 18.50 रुपयेच मोजावे लागत असल्याचे या सर्वेक्षणात म्हटलं आहे.

काय म्हटलयं सर्वेक्षणात?

स्मार्टफोन वापरात चीनंतर भारत हा जगातील दुसरा मोठा देश आहे.

जागतिक स्तरावर भारतातील इंटरनेट सेवा सर्वात स्वस्त असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

या सर्वेक्षणासाठी भारत, अमेरिका, ब्रिटनसह इतर 230 देशांतील इंटरनेटचा वापर तपासून पाहण्यात आला.

भारतात इंटरनेटचे मूल्य प्रत्येक जीबीमागे 0.26 (18.50 रुपये) डॉलर आहे.

तर अमेरिकेत तेच 12.37 डॉलर आणि ब्रिटनमध्ये 6.66 डॉलर असून याबाबतीत जागतिक सरासरी 8.53 डॉलर आहे.

जगात सर्वात महागडी इंटरनेट सेवा झिम्बाब्वेमध्ये प्रति जीबी 75.20 डॉलर इतकी आहे.

23 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर 2018 या काळात हे सर्वेक्षण करण्यात आले होते.

230 देशाकडील 6313 मोबाइल डाटा योजनांच्या माहितीच्या आधारावर हे सर्वेक्षण करण्यात आले.

यासाठी भारतातील विविध कंपन्यांच्या 57 मोबाइल डाटा योजनाची तपासणी करण्यात आली.

भारतातील स्मार्टफोनचा वाढता वापर हे इंटरनेटचा वापर वाढल्याचं मुख्य कारण असल्याचे या सर्वेक्षणात स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *