तुम्हांला ही पडतात का अश्या प्रकारची स्वप्नं: तर जाणून घ्या त्यामागचे अर्थ

‘मनी वसे, ते स्वप्नी दिसे’, असं आपण नेहमीचं म्हणत असतो. पण स्वप्नात दिसणाऱ्या अनेक गोष्टी वास्तवात नसतात. मात्र या स्वप्नांचा नेमका अर्थ तरी काय असतो? का पडतात अश्या प्रकारची स्वप्ने याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा वेगवेगळा अर्थ आहे. तुम्हालाही अशी स्वप्नं पडतात का? काय अर्थ असतो या स्वप्नांचा?

1-उंचीवरून  जोरात पडल्याचे स्वप्न

बऱ्याचदा झोपेत आपण उंचावरून पडतो आहोत असं स्वप्न सगळ्यांनाच पडतं. याचा अर्थ असा की तुमच्या मनात कोणती तरी भीती आहे. तुमच्या मनात काहीतरी चुकीची गोष्ट करण्याची इच्छा आहे आणि त्याचीच मनात असणारी भीती आपल्याला या स्वप्नातून आपल्याला दिसून येतो..

2- कोणीतरी पाठलाग करत असल्याचं स्वप्न

या स्वप्नाचा अर्थ असा की तुम्हाला एखाद्या गोष्टीपासून सुटका हवी आहे. ती कोणती गोष्ट आहे, हे आपल्याला इतरवेळी विचार केल्याशिवाय लक्षात येणार नाही. मात्र त्याचाच इशारा या स्वप्नातून होतोय.

3- दात तुटण्याचे स्वप्न

स्वप्नात दात तुटताना बघणं अशुभ मानलं जातं. दातांचा संबंध आत्मविश्वासाशी असतो. अशा स्वप्नांचा परिणाम तुमच्या आत्मविश्वासावर होतो. व्यक्तीला त्रास होतो

4- मरण्याचं स्वप्न बघणे

स्वप्नात आपल्याला आपण मेलेलं दिसणं हे प्रत्यक्षात वाटतं तितकं अशुभ नाही. याचा अर्थ तुम्ही वाईट गोष्टींना मागे टाकून पुढे जात आहात. तसंच स्वप्नात दुसर्‍याचं मरण बघणंदेखील तुमच्या जीवनात काही नवीन होणार असल्याची सूचना असते.

5- उशीरा पोहचणे,ट्रेन सुटणे.

याचा अर्थ तुम्ही जे काम करत आहात त्यात तुम्ही फारच गंभीर आणि या स्वप्नाचा अर्थ तुम्ही उत्साही आहात, असाही असतो.

6- पाण्यात पडल्याचे स्वप्न

स्वप्नात पाणी दिसणं हा शुभ संकेत मानला जातो. याचा अर्थ तुमच्या अडचणींपीसून लवकरच तुमची सुटका होणार आहे.

Exit mobile version