Tue. Jun 28th, 2022

पुण्यात विधानसभा निवडणुकीसाठी BJP कडून मुलाखती

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीय. यासाठी पुण्यात भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी आज मुलाखती घेण्यात आल्या. राज्याचे शिक्षणमंत्री व पुण्याचे निरीक्षक आशिष शेलार भाजप खासदार गिरीश बापट,शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यावेळी उपस्थित होते.

पुण्यात महापालिका सत्ताधारी भाजप आहे. खासदार भाजपचा आहे. शहरात आठ विधानसभा मतदारसंघात आमदारही भाजपचेच आहेत. त्यामुळे आज पुणे शहर कार्यलयाबाहेर इच्छुकांनी गर्दी केली. यात नगरसेवक आणि समर्थकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. आठ मतदारसंघात एकूण 103 जणांनी इच्छुक म्हणून मुलखती दिल्या आहेत. आठ मतदारसंघासाठी मुलखती घेत असताना विद्यमान आमदारांसह अनेक नगरसेवकांनी यामध्ये मुलाखती दिल्या.

खरंतर पुण्यात प्रत्येक मतदारसंघात इच्छुक होते.

मात्र सर्वात जास्त इच्छुक शिवाजीनगर तर सर्वात पर्वती मतदारसंघात इच्छुक होते.

विधानसभा निहाय

शिवाजीनगर 30,

कोथरूड 14,

हडपसर 9,

कॅण्टोनमेण्ट 21,

कसबा 9,

खडकवासला 11,

पर्वती 4,

वडगाव शेरी 5 अशी आकडेवारी आहे.

या आठही विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपाचे आमदार आहेत. खरंतर ज्यांना इच्छा आहे त्यांनी मुलाखती दिल्या आहेत. मात्र पक्ष जो निर्णय देईल त्याचं काम करू, असं इच्छुकांनी सांगितलंय.

खरंतर यामध्ये शिवाजीनगर कोथरूडमधून तीन जोड्या इच्छुक म्हणून मुलखतीसाठी आल्या होत्या.

इच्छुकांमध्ये आज शहरामधून आमदार,शहराध्यक्ष नगरसेवकांनी मुलाखती दिल्या.त्यामुळे पक्षश्रेष्ठी शहरात विद्यमान आठ आमदारांना तिकीट मिळणार की नवीन चेहऱ्यांना संधी देणार हे पहावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.